होमपेज › Pune › हॉटेलमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

हॉटेलमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:04AMपुणे : डेक्‍कन परिसरातील हॉटेलमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सामाजिक सुरक्षा विभागाने राजस्थान व बनारस येथील दोन युवतींची सुटका करत त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणार्‍या एजंटांसह लॉजच्या व्यवस्थापकाविरोधात डेक्‍कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. 

विशाल देशमुख (गोकुळनगर, वडगाव बु.), संतोष एजंट, विशाल एजंट व हॉटेलचा व्यवस्थापक  विनोद परशुराम वरक (25, हॉटेल अशोक डिलक्स, मूळ, कोळकेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, विनोद वरक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर सुटका केलेल्या मुलींची रेस्क्यू फाउंडेशन महंमदवाडी येथे रवानगी करण्यात आली आहे.  पोलिस हवालदार नितीन तरटे विशाल देशमुख हा शहरात लॉजेस व हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेश्या व्यवसायाकरिता मुली आणून त्यांना हॉटेल रुममध्ये ठेवतो. तसेच त्यांचे फोटो ओळखीच्या गिर्‍हाईकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवून त्यांना हॉटेल रुममध्ये पाठवून मुलींद्वारे पैसे स्वीकारत  सेक्स रॅकेट चालवत आहे, अशी माहिती मिळाली.  त्यानुसार  पोलिस निरीक्षक संजय पाटील व कर्मचार्‍यांनी डेक्कन पोलिसांसह संयुक्तरित्या जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेलवर छापा टाकून राजस्थान व बनारस येथील दोन युवतींची सुटका केली. तर त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावणार्‍या तिघांसह हॉटेलच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला; तसेच छाप्याच्यावेळी व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले. तर एकूण 4 मोबाईल व रोख 12 हजार रुपये जप्त करण्यात आले.

Tags : Pune, Sex, racket, busted, hotel