होमपेज › Pune › सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन

सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येणार्‍या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे.

वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली सेट 34 वेळा घेण्यात आली आहे. 

आता ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात  घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या स्वरूपात तर बदल झालाच आहे. शिवाय या परीक्षेत पात्र होणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ऑफलाईन प्रमाणपत्र बंद करून ते थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमाणपत्राची हार्डकॉपी देणे बंद केले असून, पात्र अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करून या विद्यार्थ्यांना यापुढे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  

यामुळे सेट विभागात येण्याची विद्यार्थ्यांना गरज भासणार नसून विद्यार्थ्यांना आपल्या मेल आयडीवरच प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सेट परीक्षा ही केवळ सहायक प्राध्यापक पदासाठीच घेण्यात येणार असल्याचे डॉ. कापडणीस म्हणाले.