Wed, Nov 21, 2018 07:28होमपेज › Pune › पुस्तकफुटीची बालभारतीकडून गंभीर दखल

पुस्तकफुटीची बालभारतीकडून गंभीर दखल

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

बालभारतीकडून यंदा नव्याने देण्यात येणारी इयत्ता दहावीची पुस्तके प्रकाशित होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बालभारतीने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात दादर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बालभारतीकडून अधिकृत पत्राद्वारे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून बालभारतीचे इयत्ता दहावीचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे भाग एक व भाग दोन अशी दोन पुस्तके सोशल मीडिया तसेच शिक्षकांच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली होती. ही पुस्तके बाजारात येण्याअगोदरच व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. खासगी क्लासचालक तसेच प्रकाशक यांच्याच फायद्यासाठी बालभारतीतीलच कुणी असा खोडसाळपणा केला का, याबाबत सर्वत्र चर्चा रंगली होती.

याबाबत बालभारतीने दिलेल्या खुलाशात स्पष्ट केले की, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेली प्रत व मंडळाची प्रत सारखीच आहे की नाही. या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही बालभारतीने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.