Fri, Nov 16, 2018 10:52होमपेज › Pune › टोच्याने वार करणार्‍या वकिलाला दोन वर्ष शिक्षा

टोच्याने वार करणार्‍या वकिलाला दोन वर्ष शिक्षा

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी 

कागदपत्रे सरकावून बसण्यासाठी जागा केल्याच्या रागातून वकिलावर कागदपत्रांना भोक पाडण्याच्या (टोच्याने) धारदार हत्याराने मानेवार आणि छातीवर वार करणार्‍या वकिलाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी एस. पाटील यांनी दोन वर्ष शिक्षा आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. परंतु, गुन्ह्याचा तपासामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल तपासअधिकार्‍यांवर न्यायालयाने ताशेरे ओढताना, वरिष्ठांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

अ‍ॅड. संजयराव लक्ष्मण काळे (रा. वडगाव शेरी) असे शिक्षा सुनाविण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत अ‍ॅड. लक्ष्मण कुमार जाधव (33, रा. मरकळेवाडा, शिवाजीनगर) यांनी याबाबत मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सोमनाथ अरणे यांनी काम पाहिले. बाररूमध्ये जागेच्या व बसण्याच्या कारणावरून इतर वकिलांशीही अ‍ॅड. काळे यांचे वाद होत होते. दि. 14 ऑक्टोबर 2013 रोजी जाधव यांनी मारहाणीची तक्रारही दिली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात वागणुकीमध्ये सुधारणा आणण्याविषयी लिहूनही दिले होते. दि. 27 ऑगस्ट 2014 रोजी अ‍ॅड. जाधव हे नेहमी प्रमाणे ग्राहक मंचात पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास आले. कोर्टाचे कामकाज संपवून सह्या करण्यासाठी 11 वाजण्याच्या दरम्यान ते जेव्हा बाररूमध्ये गेले.

तेव्हा अ‍ॅड. काळे हा सर्व कागदपत्रे टेबलावर पसरवून बसला होता. त्यावेळी अ‍ॅड. जाधव यांनी कागदपत्रे सरकावून थोडीशी जागा केली. तेवढ्यात अचानक अ‍ॅड. काळे उठला व त्यांना शिवीगाळ करू लागला. अ‍ॅड. काळे याने त्याच्या खिशातील टोचा बाहेर काढला. अ‍ॅड. जाधव यांचे केस ओढून त्यांनी टोच्याने जाधव यांच्या गळ्यावर मारण्यास सुरूवात केली. गळ्यावरील टोच्याचा वार चुकवताना टोच्याचा वार त्यांच्या छातीवरही झाला. तेथेच असलेल्या काही वकिलांनी व कर्मचार्‍यांनी अ‍ॅड. काळेला बाहेर काढले. त्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या मानेला आणि छातीला झालेल्या रकमेतून रक्‍त येऊ लागले. त्यानंतर अ‍ॅड. जाधव यांनी लागलीच 100 नंबरला फोन करून तक्रार नोंदवली. 

Tags : Pune, Sentenced,  two, years, punishment, Token