Sun, Nov 18, 2018 09:50



होमपेज › Pune › ज्येष्ठ इतिहास संशोधक सदाशिव शिवदे यांचे निधन 

ज्येष्ठ इतिहास संशोधक सदाशिव शिवदे यांचे निधन 

Published On: Apr 08 2018 12:19AM | Last Updated: Apr 08 2018 12:18AM



पुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ इतिहास संशोधक सदाशिव शिवदे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. आज (रविवारी) सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

डॉ. सदाशिव शिवदे हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. डॉ. शिवदे हे व्यवसायाने पशुवैद्यक होते. त्यांना इतिहासाची आवड होती. यामुळे ते इतिहास क्षेत्रातील अभ्यासाकडे वळले. यामुळे पशुवैद्यक सेवा पुरवित असतानाच त्यांनी मराठी, इतिहास विषयात एम.ए. ची पदवी घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र त्यांनी लिहीले. ज्वलंत तेजस संभाजीराजे हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. तसेच माझी गुरो, माझी माणसे हे ग्रामीण जीवनावर आधारीत पुस्तकासह त्यांची इतिहास विषयक पुस्तके प्रकाशित झाली असून, दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळाचे ते विश्वस्त होते. तसेच महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते. आज सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. संजय शिवदे आणि डॉ. विद्याधर शिवदे यांचे ते वडिल होते.