Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Pune › परवाना नसलेल्या विक्रेत्याला अन्नपदार्थांची विक्री

परवाना नसलेल्या विक्रेत्याला अन्नपदार्थांची विक्री

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

विक्रेत्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) परवाना आहे की नाही याची खात्री न करता त्याला शक्तिवर्धक अन्नपदार्थ (फूड डायट सप्लिमेंट) देणार्‍या वितरकाला ‘एफडीए’ने 60 हजार रुपयांचा दंड केला आहे. गेल्या आठवड्यात हा दंड करण्यात आला असून, यापुढे वितरकांनी ‘एफडीए’चा परवाना नसलेल्या विक्रेत्यांना जर अन्नपदार्थांची विक्री केली तर वितरक, घाऊक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 च्या परवाना गट क्रमांक 14 च्या नियमाचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे वितरक किंवा घाऊक विक्रेत्यांकडे परवाना असणे बंधनकारक आहेच. त्याबरोबरच ज्यांना अन्नपदार्थ देणार आहेत (ग्राहक वगळता) त्यांनी ‘एफडीए’कडून परवाना घेतला आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. जर परवान्यांची खात्री न करता अन्नपदार्थांची विक्री केली तर त्यांच्यावर यापुढे  कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ‘एफडीए’ने दिली.