Wed, Jan 23, 2019 08:36होमपेज › Pune › लोकप्रतिनिधी काम करणारा निवडावा :  राज ठाकरे

लोकप्रतिनिधी काम करणारा निवडावा :  राज ठाकरे

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 03 2018 12:34AMधनकवडी : वार्ताहर

लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या गरजा ओळखून विकासकामे केली पाहिजेत. तसेच उद्यानात दिलेल्या सोईसुविधांचा वापर नागरिकांसाठी राबविले आहेत त्याचा वापर व्यवस्थितपने केला पाहिजे, काम करूनदेखील लोक मत देत नाहीत यामुळे त्या भागातील विकासकामे करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे चांगली विकास करणारे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

कात्रज मोरे बाग परिसरात नवनिर्मित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक वसंत मोरे यांनी केले होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे, माजी नगरसेविका रूपाली पाटील, युगंधरा चाकणकर, माजी नगरसेवक बाबू वागस्कर, किरण शिंदे, अ‍ॅड. गणेश सातपुते, पदाधिकारी योगेश खैरे, नितीन शेलार, प्रवीण रासकर, नगरसेवक युवराज बेलदरे, उद्यान विभागप्रमुख  अशोक घोरपडे, मनपा सहाय्यक आयुक्त युनुस पठाण उपस्थित होते.नगरसेवक वसंत मोरे यांनी  सांगितले या उद्यानात देखील नागरिकांच्या गरजेची विकासकामे केली जात आहेत. या उद्यानात जिम, खेळासाठी मैदाने, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा भव्य असा भिंतीवरील जीवनपट, सैराट सेल्फी पॉईंट, विद्युत रोषणाई सुश्राव्य संगीत असलेले दोन जॉगिंग ट्रक, राजमाता अहिल्यादेवी यांचा पुतळा याची कामे केली आहेत.