Mon, May 20, 2019 08:16होमपेज › Pune › 'डेंग्यू’वर आयुर्वेदिक कॅप्सूलचा उतारा शक्य होणार

'डेंग्यू’वर आयुर्वेदिक कॅप्सूलचा उतारा शक्य होणार

Published On: May 21 2018 5:45PM | Last Updated: May 21 2018 5:45PMपुणे : प्रतिनिधी 

'एडिस इजिप्ती' या डासांपासून पसरणाऱ्या डेंग्यू या आजारावर कोणताही ठराविक उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण, येत्या काही दिवसांमध्ये यावर एक आर्युवेदिक कॅप्सूलच्या स्वरूपात औषध उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील शास्त्रज्ञ याबाबत अधिक संशोधन करत असून येत्या ऑक्टोबरपर्यंत ही गोळी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

डेंग्यू ताप कमी करणारी ही गोळी ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषद’ (आयसीएमआर) च्या बेळगावी येथील केंद्रातील शास्त्रज्ञांकडून विकसित करण्यात येत आहे. ही गोळी पूर्णपणे आर्युवेदिक औषधांपासून बनविलेली असून त्याविषयी अधिक संशोधन सुरु आहे. या संशोधनातून गोळीची परिणामकारकता दिसून आली तर अन्न व औषध प्रशासनाकडून यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. 

याविषयी ‘सीसीआरएस’चे संचालक प्रोफेसर वैद्य के. एस. धिमान म्हणाले की, ही गोळी सात आर्युवेदिक औषधांपासून बनविली जात आहे. याबाबत 2015 मध्ये संशोधनाला सूरुवात करण्यात आली असून हे औषध सुरक्षित असल्याचे अहवाल आलेले आहेत. 

गेल्यावर्षी देशात दीड लाख रुग्ण
राष्ट्रीय व्हेक्टर रोग नियंत्रण कार्य्रक्रम संचालनलयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर 2017 दरम्यान भारतात डेंग्यूचे एक लाख 57 हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी 250 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये एक लाख 29 हजार जणांना डेंग्यूची लागण झाली होती. यातील 245 जणांचा मृत्यू झाला होता.