Thu, Jul 18, 2019 00:49होमपेज › Pune › ‘तरुणांनो हृदयाचा आवाज ऐका’

‘तरुणांनो हृदयाचा आवाज ऐका’

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:23AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

जीवनात अनेकदा महत्त्वाच्या प्रसंगी मेंदूचे नाही, तर हृदयाचा आवाज ऐकला. त्यामुळे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे तरुणांनी नेहमी हृदयाचा आवाज ऐकायला हवे, असे प्रतिपादन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

डॉ. माशेलकर यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयुका, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, सी-डॅक आदी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. माशेलकर यांचे गुरु प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एम.एम. शर्मा, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम उपस्थित होते. 

यावेळी डॉ. माशेलकर म्हणाले की, कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर ऑफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर ऑफ आयडिया’ महत्त्वाची असते. आम्ही संशोधनाला सुरूवात केली त्या वेळी संसाधने अगदीच तोकडी होती. तरीही मी, माझे गुरू डॉ. शर्मा यांच्यासह केवळ तीन भारतीय अभियांत्रिकी शास्त्रज्ञांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली. तरुणांनी हृदयाचा आवाज ऐकायला हवा. अनेकदा लोक मला विचारतात, तुम्ही इतके महत्त्वाचे निर्णय कसे घेता? त्यावर मी त्यांना सांगतो, मैने दिलकी आवाज सुनी. हळदीच्या स्वामित्वहक्काचा लढा, ‘आयसर’ स्थापनेसाठी शंभर एकर जमीन देण्याचा निर्णय अशा महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी मी असेच निर्णय घेतले.