Fri, Jan 18, 2019 19:06होमपेज › Pune › स्कूल बसमध्ये रंग खेळणे जीवावर बेतले; विद्यार्थ्याचा मृत्यू 

स्कूल बसमध्ये रंग खेळणे जीवावर बेतले; विद्यार्थ्याचा मृत्यू 

Published On: Mar 01 2018 7:48PM | Last Updated: Mar 01 2018 7:48PMपुणे: प्रतिनिधी 

होळीनिमित्त एकमेकांना रंग लावण्याची चढाओढ एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर बेतली. मित्राला रंग लावण्याच्या नादात शाळेतून घरी निघालेला एक शाळकरी विद्यार्थी धावत्या स्कूलबसमधून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.

राज सतीश कांबळे (वय 14) असे बसमधून खाली पडून मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आहे. दिघी येथील सयाजीनाथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (मोझे स्कूल) शिकत होता. बसमध्ये मित्र एकमेकांना रंग लावत होते, तर कोणी फुगा फेकून मारत होता. चालत्या स्कूल बसमध्ये हा प्रकार सुरू होता. दरम्यान, पाय घसरून राज बसमधून बाहेर फेकला गेला. रस्त्यावर तो जोरात आपटल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.