Thu, May 28, 2020 22:50होमपेज › Pune › शिष्यवृत्तीतून मिळेल उत्तम कामगिरीची प्रेरणा : अजित पवार

शिष्यवृत्तीतून मिळेल उत्तम कामगिरीची प्रेरणा : अजित पवार

Published On: Jun 11 2018 10:47AM | Last Updated: Jun 11 2018 12:03PMपुणे : प्रतिनिधी

क्रीडा प्रकाराला नावलौकीक मिळवून देण्यासाठी राज्यातील विविध संघटनांसह जनतेने खेळ व खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे. खेळाडूंना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तींमुळे त्यांना भविष्यात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे मत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. 

गेल्या वर्षी सायकलिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्टारकेन स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने महाराष्ट्र संघातील सायकलपटूंना शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भारतीय आलिम्पिक संघाचे सचिव राजीव मेहता, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव ओंकार सिंग, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम रोठे, सचिव प्रताप जाधव, प्रशांत खटावकर आदी उपस्थित होते.

राजीव मेहता म्हणाले, देशात गुणवत्ता आणि प्रतिभा असलेले असंख्य खेळाडू आहेत. या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून पाठिंबा देण्याची गरज आहे. विविध राष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून महाराष्ट्राची आणि देशाची मान उंचावणार्या खेळाडूंना या शिष्यव्रुतीचा नक्कीच फायदा होईल असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी जायंट स्टारकेनच्यावतीने २३ सायकलपटूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच, इतिहासात पहिल्यांदाच महाराष्‍ट्राच्या सायकलिंग संघाने एकाच वर्षी एमटीबी राष्ट्रीय आणि नॅशनल ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. रूतुजा सातपुते, प्रणिता सोमण, विवेक वायकर, पूजा दानोळे, सिध्देश शर्मा या प्रमुख सायकलपटूंनी शिष्यव्रुतीचा स्वीकार केला.

Tags : pune, congress, NCP, ajit pawar, Commonwealth games, Olympic