Mon, Jun 17, 2019 02:54



होमपेज › Pune › टंचाई आराखड्यास जि.प. प्रशासनाची उदासीनता

टंचाई आराखड्यास जि.प. प्रशासनाची उदासीनता

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 11:23PM



पुणे : नवनाथ शिंदे

जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील गावात पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पुरवणी टंचाई आराखड्याचे नियोजन वेळेत होणे गरजेचे हेाते. मात्र, गटविकास अधिकारी ते ग्रामीण पाणीपुरवठा उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे टंचाई आराखड्यासह अंदाजपत्रक जिल्हाधिकार्‍यांकडे उशिरा पाठविण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे काही गावात उन्हाळासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे जर टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागत असेल, तर टंचाई आराखड्याची आवश्यकता खरेच आहे का, असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला आहे. 

जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालखंडातील पहिल्या टप्प्यातील टंचाई आराखडा जिल्हाधिकार्‍यांकडे उशीरा पाठविण्यात आल्याचे हास्यास्पद उत्तर दिले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने प्रस्तावित कामांसाठी 35 कोटी 33 लाखांचा टंचाई आराखडा डिसेंबर अखेर सादर करण्यात आला. त्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली. दरम्यान प्रशासन अनास्थेमुळे आतापर्यंत गावांचे  फक्त 60 अंदाजपत्रक तयार करुन मंजुरीला पाठविण्यात आले आहेत. त्यास अद्यापपर्यंत परवानगी न मिळाल्याने टंचाई अंदाजपत्रक जिल्हाधिकार्‍यांच्या टेबलावर पडून आहे.