Tue, Apr 23, 2019 08:02होमपेज › Pune › सातारा रोड बीआरटीसाठी आता 15 मेपर्यंत मुदत

सातारा रोड बीआरटीसाठी आता 15 मेपर्यंत मुदत

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

 सातारा रोड बीआरटीची कामे अजूनही अपूर्ण असून, ती पूर्ण होण्यास अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र पीएमपी प्रशासनाने 15 मेपर्यत कामे पूर्ण करावीत, असे महापालिका प्रशासनाला सांगितले आहे.

 सातारा रोड बीआरटीचे काम मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून बस वाहतूक करताना पीएमपी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यातही या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीआरटी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे कित्येक ठिकाणी बसथांबे नाहीत. जे बसथांबे आहेत. त्या ठिकाणी वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढीत जाणे जिकीरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे बस मार्गावर प्रवाशी असून सुद्धा कित्येकदा या मार्गावरून धावणार्‍या बसेसमध्ये प्रवाशांची संख्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. सध्या या मार्गावर काम सुरू असल्यामुळे बसेच चालविताना कधी काम झालेल्या काही मार्गातून तर पद्मावतीपासून पुढे कात्रजपर्यत काम सुरू असल्यामुळे सर्वसाधारण मार्गातून बसेस चालविण्यात येत आहेत. त्यामुळे बसचालकांचा देखील चांगलाच गोंधळ उडत आहे. 

 या बीआरटी मार्गाचे काम महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. वास्तविक पाहता हे काम 15 एप्रिलपर्यत पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत माहिती देताना पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, सातारा रोड बीआरटीचे काम 15 एप्रिलपर्यत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र अजूनही ते अपूर्ण अवस्थेत आहे. याबाबत महापालिकेकेडे पाठपुरावा केलेला आहे. त्यानुसार हे काम 15 मेपर्यत पूर्ण होणार आहे. त्यानंतर बसचे ट्रव्हल ऑडिट घेण्यात येणार आहे. या ऑडिटमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात येणार आहे. त्यानंतरच बस सुरू करण्यात येईल.