Wed, Jan 16, 2019 04:45होमपेज › Pune › सिंगापूरच्या सरपंचपदी निर्मला लवांडे 

सिंगापूरच्या सरपंचपदी निर्मला लवांडे 

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 12:41AM
सासवड : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील सिंगापुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला गोपाळ लवांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुर्वीच्या सरपंच जयश्री वारे यांचा कार्यकाल पुर्ण झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली.

यावेळी निर्मला लवांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी बी. एस. भिसे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. ग्रामसेविका एम. व्ही. होले यांनी सहाय्यक म्हणुन काम केले. यावेळी उपसरपंच स्वाती कोरडे, सदस्य दशरथ लवांडे, शुभांगी पवार, रामदास उरसळ, अक्षय उरसळ उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी नवनिर्वाचित सरपंच लवांडे यांचा सत्कार केला. विलास लवांडे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप लवांडे यांनी आभार मानले.