Sat, Jul 20, 2019 23:31होमपेज › Pune › 'कारगील’ मध्ये धावणार धावपट्टू; मॅरेथॉनचे आयोजन

'कारगील’ मध्ये धावणार धावपट्टू...!

Published On: Jun 01 2018 4:48PM | Last Updated: Jun 01 2018 4:48PMपुणे : प्रतिनिधी

कारगील ही युध्दभुमी म्हणून आपल्याला प्रचलित आहे, त्याचवेळी तिला शांततेचा आणि सामर्थ्याचा संदेश देणारी बुध्द भुमी म्हणून देखील ओळखले जाते. आता याच कारगीलच्या भुमीवर धावपट्टू धावणार आहेत. कारण, याठिकाणी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी दिली.

कारगील इंटरनॅशनल मॅरेथॉन आणि सरहद संस्थेच्या वतीने कारगील मध्ये पर्यटकांची संख्या वाढावी आणि क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी कारगील येथे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोज करण्यात आले आहे. त्याच्या पार्श्‍वभुमीवर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नहार बोलत होते. यावेळी मॅरेथॉनचे मुख्य संयोजक संजीव शहा, अरविंद बिजवे उपस्थित होते.

यावेळी नहार म्हणाले, यंदाची दुसरी कारगील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पहिल्या वर्षीप्रमाणेच ३,५, १० कि.मी. तसेच २१ ४२ कि.मी. व ६०, १०० कि.मी. अल्ट्रा मॅरेथॉन आणि १६० किलो मीटरचे टायगर  हील चॅलेंज या प्रकारांमध्ये २ सप्टेंबर रोजी कारगीलमध्ये होणार आहे. या मॅरेथॉनला भारताचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, जम्मु काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती उपस्थित राहणार आहे. तसेच काश्मीर सरहद्दीचे संरक्षण करणार्‍या गुजर बकरवाल समाजाला ही मॅरेथॉन समर्पित करण्यात आली आहे. यावेळी मॅरेथॉनच्या पुर्वसंध्येला कारगील गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच याचवेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहेत.