होमपेज › Pune › दिंडी चालली.. चालली... : देहूत भरला वारकऱ्यांचा आनंदमेळा (Video)

दिंडी चालली.. चालली.. : देहूत भरला वारकऱ्यांचा आनंदमेळा (Video)

Published On: Jul 05 2018 4:10PM | Last Updated: Jul 05 2018 4:51PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ  

संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातूनही वारकरी देहूत दाखल झाले आहेत. मुख्य मंदिराच्या देऊळवाड्यात पारंपारिक वेशभूषा करून वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत. मानाच्या दिंडया देऊळवाडयात दाखल झाल्या असून टाळ-मृदुंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा नामघोष करीत वारकऱ्यांनी ठेका धरला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनाही टाळ वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी त्यांना साथ केली.