Mon, Nov 19, 2018 13:31होमपेज › Pune › संत सोपानकाका पालखीचे मंगळवारी प्रस्थान

संत सोपानकाका पालखीचे मंगळवारी प्रस्थान

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 09 2018 1:08AMसासवड : प्रतिनिधी

आषाढीवारीसाठी सासवड येथून संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे जेष्ठ वद्य 12 म्हणजेच मंगळवारी (दि.10) प्रस्थान होणार असून 13 दिवसांचा प्रवास करून हा सोहळा 22 जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे. यानिमित्त सोपानकाकांच्या संजीवन समाधी मंदिरात जय्यत तयारी सुरु आहे. संत सोपानकाका बँकेच्या वतीने देण्यात आलेल्या चांदीच्या रथाला झळाळी देण्यात आली आहे. जेष्ठ वद्य बारस म्हणजेच दि. 10 जुलै रोजी सोपानदेव मंदिरात मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 12 वाजता देऊळवाड्यातून पालखी आषाढवारीसाठी प्रस्थान ठेवेल. 

पालखीचा मुक्काम पुढीलप्रमाणे राहणार आहे, दि. 10 जुलै पांगारे, दि. 11 मांडकी, दि. 12 निंबुत, दि. 13 सोमेश्वरनगर, दि. 14 कोर्‍हाळे बुद्रुक, दि. 15 बारामती, दि. 16 लासुर्णे, दि. 17 निरवांगी, दि. 18 अकलूज, दि. 19 बडले, दि. 20 भंडी शेगाव, दि. 21 वाखरी आणि दि. 22 जुलै पंढरपूर. दि. 20 जुलै रोजी टप्पा (भंडी शेगाव) येथे ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानकाका महाराज या बंधूंच्या भेटीचा सोहळा पररंपरेनुसार होणार आहे. पुरंदरसह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे 80 हुन अधिक दिंड्या, सव्वाशे वाहने, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आणि लाखाच्या संख्येने वैष्णवांची दाटी असा हा वैभवशाली सोहळा होणार असल्याचे सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी यांनी सांगितले.