Thu, Apr 25, 2019 21:44होमपेज › Pune › ‘काकडे यांनी आपला मेंदू तपासून पहावा’

‘काकडे यांनी आपला मेंदू तपासून पहावा’

Published On: Jan 24 2018 7:43PM | Last Updated: Jan 24 2018 7:32PMपिंपरी : प्रतिनिधी

पुण्याच्या त्या व्यक्तीचा मेंदू तपासून घेण्याची घेण्याची गरज आहे. पुण्यात मेंदू तपासण्याचे अनेक रुग्णालय आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार संजय काकडे यांचे नाव न घेता केली. चिंचवडमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपासोबत युती न केल्यास शिवसेनेची वाईट अवस्था होईल, अशी टीका खासदार काकडे यांनी मंगळवारी (दि.23) केली होती. त्यासंदर्भात विचारले असता ‘सदर व्यक्तीस मी ओळखत नाही. मात्र, त्यांचा मेंदू तपासण्याची गरज आहे. पुण्यात अनेक चांगली रुग्णालये आहेत. तेथे त्यांची एकदा तपासणी करावी’ असा टोला  राऊत यांनी लगावला.