Mon, Jul 22, 2019 13:41होमपेज › Pune › संभाजी भिडे सन्मान महामोर्चा २८ मार्च रोजी

संभाजी भिडे सन्मान महामोर्चा २८ मार्च रोजी

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि पुण्याचे मिलिंद एकबोटे हे अत्यंत नि:स्वार्थीपणे राष्ट्रहिताचे काम अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत. हे दोघेजण जातपात न पाहता काम करीत असूनही त्यांना कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये निष्कारण गोवले गेले आहे. त्यामुळे भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ दि. 28 मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांना महामोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे पुणे महानगर कार्यवाह प्रा. पराशर मोने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय जढर, मुकुंद मासाळ, संजय पासलकर आदी उपस्थित होते.

संघटनेचा पुणे जिल्ह्याचा महामोर्चा शनिवारवाडा येथून सकाळी 10.30 वाजता सुरू होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, दारूवाला पूल, 15 ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहे, असे मोने यांनी सांगितले. मोने म्हणाले, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या महामोर्चाद्वारे सर्व महाराष्ट्रभरातून केली जाणार आहे. तसेच ज्या लोकांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येईल.

 

Tags : pune, pune news, Sambhaji Bhide, honor, march,