Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Pune › सलमान खानचा निषेध

सलमान खानचा निषेध

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:42PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

टीव्हीवरील मुलाखतीमध्ये वाल्मीक समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाची खिल्ली उडविणारा हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा वाल्मीक समाज पंचायतीच्या वतीने शनिवारी (दि.23) निषेध करण्यात आला. या संदर्भात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

दोन्ही अभिनेत्यांनी अनुसूचित जातीतील वाल्मीकी समाजाची खिल्ली उडणारे विधान मुलाखतीमध्ये केले. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाल्मीकी समाज पंचायतीने केली आहे. दोघांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून निषेध रॅली काढण्यात आली. दोघांनी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली गेली.

या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आश्‍वासन कांबळे यांनी दिले. याप्रसंगी पंचायतीचे खडकी विभाग अध्यक्ष आनंद चंडालिया, कार्याध्यक्ष राजेश काकडे, आनंद खैराले, कैलाश बिडलान, अजय पारचा, कैलास खैराले आदी उपस्थित होते.