Tue, Jun 18, 2019 23:04होमपेज › Pune › सलमान खानच्या ‘द दबंग’ कार्यक्रम आयोजकावर गुन्हा

सलमान खानच्या ‘द दबंग’ कार्यक्रम आयोजकावर गुन्हा

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:41AMपिंपरी : प्रतिनिधी

सलमान खान आणि इतर बॉलीवुड कलाकारांनी आपली कला सादर केलेल्या, बालेवाडी येथे झालेल्या ‘द दबंग, द टूर पुणे’ या कार्यक्रमात नोवेक्स कंपनीकडे हक्क असणारी गाणी वाजवून, त्याबदल्यात मोबदला न देता फसवणूक केली. याप्रकरणी आयोजक फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मोहम्मद सैय्यद (29, रा. अंधेरी, मुंबई) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. तर फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीच्या संचालक समीर दिनेश पवानी, व्यवस्थापक मनिष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 मार्च रोजी सायंकाळी सात ते दहा यावेळेत बालेवाडी स्टेडीयम म्हाळुंगे येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीच्या संचालक बँक खात्यात पुरेसी रक्कम नसताना नोवेक्स कंपनीला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. याबदल्यात नोवेक्स कंपनीकडे हक्क असणारी गाणी सलमान खानच्या ‘लाईव्ह द दबंग’ या कार्यक्रमात वाजवली गेली. 

खात्यात रक्कम नसणारा धनादेश देवून नोवेक्स कंपनीचा विश्‍वासघात केला. फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचा फायदा व्हावा या हेतूपोटी हे करुन आमची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

 

Tags : pimpri, pimpri news, Salman Khan, The Dabangg program, crime