Mon, Feb 18, 2019 03:23होमपेज › Pune › वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:20AMपिंपरी : प्रतिनिधी 

चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणार्‍या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने वाहनांना आता सेफ्टी गार्ड बसवू शकतो, अशी माहिती इंडियन सेफ्टी गार्डस इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष मनिष कोल्हटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

कोल्हटकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चारचाकी वाहनांचे सेफ्टी गार्ड पादचारी व प्रवाशांना सुरक्षित नसल्याने  रस्ते महामार्ग व परिवहन मंत्रालयाचे  प्रियांक भारती यांनी वाहनांना बसवलेले क्रॅश गार्डस काढून टाकण्याचे  परिपत्रक काढून सर्व राज्यांना दिले होते .

त्यांच्या परिपत्रकामुळे अनेक राज्यात वाहनांना बसविलेले सेफ्टी गार्ड काढण्याची कारवाई सुरू केली होती. यावर असोसिएशनने कोर्टात धाव घेतली. याबाबतीतची पहिली सुनावणी दि 12 मार्च 18 झाली. 

या सुनावणीदरम्यान कोणत्या कायद्याच्या आधारे ही बंदी आणली असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर रस्ते वाहतूक रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर व्हेइकल सेक्शन 110 अंतर्गत कायदा बनवून बंदी आणू शकतो असे उत्तर दिले. यावर कोर्टाने ताशेरे ओढत 2 पानी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. 20 ऑगस्ट 18 पर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गीता मित्तल व सी.हरिशंकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.

कोल्हटकर यांनी सांगितले आहे की, प्रवासी आणि पादचारी यांची आम्हालाही काळजी आहे.केवळ आमचे उत्पादन विकून मोकळे होणार नाही तर वाहनाचे सौंदर्य व मानवी सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित असे सेफ्टी गार्डची निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. या निर्णयामुळे उद्योजक व नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. हे सेफ्टी गार्ड बनवणे,विकणे आणि वाहनांना लावण्यावर आता बंदी नाही.