Mon, Jan 21, 2019 07:27होमपेज › Pune › सदाभाऊ खोत प्रकृती अस्‍वास्‍थ्यामुळे रुग्‍णालयात

सदाभाऊ खोत प्रकृती अस्‍वास्‍थ्यामुळे रुग्‍णालयात

Published On: Jul 21 2018 12:56AM | Last Updated: Jul 21 2018 12:56AMपुणे : पुढारी ऑनलाईन

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे  नागपूरहून पुण्यात रात्री उशीराने विमानाने आल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि उलटयाचा त्रास झाला. त्यांना व्हर्टिगोचा त्रास यापूर्वीही झालेला आहे. 

अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रात्री नवीन सर्किट हाऊस येथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.