Wed, May 22, 2019 22:25होमपेज › Pune › अभ्यासक्रमात खेळाच्या समावेशासाठी सचिनने घेतली शपथ 

अभ्यासक्रमात खेळाच्या समावेशासाठी सचिनने घेतली शपथ 

Published On: May 21 2018 7:23PM | Last Updated: May 21 2018 7:23PMविद्यापीठाच्या मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया निमित्त सचिन तेंडुलकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिनची मुलाखत घेतली.

पुणे : प्रतिनिधी 

आपल्याकडे मोकळ्या जागा हल्ली राहत नाहीत, काहीतरी उभारले जाते. अनेक शाळांना मैदाने नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळांपासून वंचित राहावे लागत आहे. ज्या गतीने मैदाने कमी होत आहेत, त्याचा विचार करुन मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल, असे मत सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात खेळाचे महत्त्व शाळेपासूनच बिंबवायला पाहिजे. त्यासाठी शिक्षणामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा, असे सचिन म्हणाला. खेळाचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात व्हावा आणि विद्यार्थ्यांचे पाय मैदानाकडे वळावे यासाठी प्रयत्न करीन अशी शपथ त्याने उपस्थितांच्यासहित घेतली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया मोहिमेची सुरुवात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते शारीरिक व शिक्षणशास्त्र विभागाच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. सध्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या मानसिक आणि शैक्षणिक ताणावर खेळ हाच पर्याय असून विद्यार्थ्यांनी मैदानावर जाऊन खेळायला हवे, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल जनजागृती करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. 

Image may contain: 2 people, people sitting and table

या मिशनच्या उद्घाटन सोहळ्यात सचिन यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरु डॉ. एन. एस उमराणी, प्र-कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डॉ. दीपक माने तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष आणि क्रीडा संचालक उपस्थित होते. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या आयुष्यातील अनेक पैलुंना हात घालत खेळाचे महत्व सांगितले. 

यावेळी शाळेच्या मैदानांबाबत विचारले असता सचिन म्हणाला की, आपल्याकडे अनेक शाळांना मैदान नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे. ज्या शाळांकडे मैदाने आहेत, त्यांनी मैदाने नसलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध करुन द्यायला हवे, असेही सचिन यावेळी म्हणाला. 

Image may contain: 12 people, people smiling, people standing and outdoor

शॉर्टकट बद्दल बोलताना सचिन म्हणाला की, आयुष्यात शॉर्टकट घेऊ नका. त्यासाठी शाळेतील पहिल्या मॅचचे उदाहरण देत सचिन म्हणाला की, शाळेतील पहिल्या मॅचममध्ये २४ धावा काढल्या होत्या. त्यावेळी स्कोअर लिहिणार्‍याने सांगितले की, पेपरमध्ये नाव येण्यासाठी त्यावेळी ३० रण काढावे लागतात. माझा स्कोअर त्यांनी ३० लिहिला. दुसर्‍या दिवशी सरांनी किती रण काढले असे विचारले असता प्रामाणिकपणे २४ काढल्याचे सांगितले. परंतु पेपरात नाव येण्यासाठी स्कोअर लिहिणार्‍याने तीस लिहिले. त्यावर प्रशिक्षक सरांनी पेपरात नाव यायचे असेल तर स्वतःच्या जीवावर रण काढ. तसेच यशासाठी कुठलाही शार्टकट न पत्करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. 

यावेळी सचिन म्हणाला, आपण आपल्या समस्येवर लक्ष न देता तिच्या उपायावर लक्ष केंद्रीत करु त्यावेळी आपल्याला मार्ग नक्की सापडेल. तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. लहान मुलांनी मस्ती करणे, मित्रांसोबत वेळ घालवणे, दंगा करणे तितकेच आवश्यक आहे. तंदुरस्त राहण्यासाठी खेळ हे आवश्यक आहेत. केवळ तरुणांनीच नाही तर सर्वांनीच खेळ खेळायला हवेत, असेही सचिन यावेळी म्हणाला. 

Image may contain: 2 people, people sitting and text

सध्या विविध सोशल माध्यम आली आहेत. ती जेव्हा नव्हती तेव्हा आपलं आयुष्य तणावमुक्त होतं. कुठंतरी वाटतं की हे सगळे नसते तर बरे झाले असते. खेळामुळे आयुष्यात अनेक बदल झाले. क्रिकेट म्हणजे माझ्या आयुष्यात ऑक्सिजन आहे असेही सचिन ने आवर्जुन नमूद केले. 

शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळाचा समावेशासाठी शपथ 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळाचा समावेश झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये चांगले बदल बघायला मिळतील, अशी आशा व्यक्त करत सचिन तेंडुलकर यांनी उपस्थितांकडून खेळाचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात व्हावा आणि विद्यार्थ्यांचे पाय मैदानाकडे वळावे यासाठी प्रयत्न करीन अशी शपथ घेतली. खेळांप्रती जागृती निर्माण करण्याची व त्याप्रती कर्तव्य बजावताना कृतिशील राहण्याची शपथ भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी घेतली.

Image may contain: 4 people, people standing

Tags : Sachin tendulkar, oath, inclusion, game, educational curriculum, pune news, cricket