Wed, Nov 21, 2018 15:18होमपेज › Pune › पुणे : एसएफआयच्या मद्यधुंद अध्यक्षाचा विद्यापीठात राडा

पुणे : एसएफआयच्या मद्यधुंद अध्यक्षाचा विद्यापीठात राडा

Published On: Apr 18 2018 10:25AM | Last Updated: Apr 18 2018 10:25AMपुणे : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) विद्यापीठ अध्यक्षाने गोंधळ घातला. विद्यापीठातील वसतीगृह क्रमांक ९ मध्ये खोलीच्या काचा फोडून मोठा आवाज करत गोंधळ घातला. हा प्रकार काल (मंगळवार दि.१७) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. या गोंधळानंतर विद्यापीठाचे सुरक्षा विभाग, वसतीगृहाचे अधिकारी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले.

याबाबत वसतीगृह अधिकारी टी.डी निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अकरा वाजता एसएफआयचा विद्यापीठ अध्यक्ष सतीश देबरे याने मद्यधुंद अवस्थेत वसतीगृहात गोंधळ घातला. त्याने खोलीच्या काचा फोडल्या. यात त्याच्या हातला जखम झाली. घटनास्थळी त्याचे रक्त पडले होते. त्याला उपचाराबाबत विचारले असता त्याने उपचाराची गरज नसल्याचे सांगितले.

या प्रकारानंतर विद्यापीठ वसतीगृहातील मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची चौकशी करुन देबरे याच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्याथी परिषद करणार असल्याचे अभाविपचे विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे यांनी सांगितले.

Tags :Pune, University, Hostel, SFi, ABVP, President,