Tue, Jun 18, 2019 23:24होमपेज › Pune › पुणे : सहाय्‍यक प्राध्यापक भरतीसाठी आमरण उपोषण

पुणे : सहाय्‍यक प्राध्यापक भरतीसाठी आमरण उपोषण

Published On: Jun 04 2018 4:59PM | Last Updated: Jun 04 2018 4:59PMपुणे : पुढारी ऑनलाईन

सहाय्‍यक प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवावी म्‍हणून गेल्या काही काळापासून राज्यभर सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांनी आंदोलन सुरू केले आहे. परंतु, सरकारने त्याची योग्य ती दखल न घेतल्याच्या निषेधार्थ पात्रताधारकांनी पुण्यातील शिक्षण संचालक, उच्‍च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंब्यासाठी नागपुरातही पात्रताधारक उपोषणास बसले आहेत. 

यावेळी आंदोलकांनी सरकार दरबारी वारंवार फेर्‍या मारून, निवेदने देऊनही दखल न घेतल्याचा निषेध केला. तसेच आकृतीबंदांच्या नावाखाली प्राध्यापक पदभरती लांबविणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करत संबंधीत मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन तात्‍काळ राजीनामा द्यावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी प्राध्यापक पदभरती, त्यासाठी झालेली आंदोलने आणि निवेदने याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पात्रताधारक आंदोलकांनी केली. 

No automatic alt text available.

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून त्‍वरित भरती सुरू करावी अन्यथा पात्रताधारकांना आत्‍महत्या करण्याची रितसर परवानगी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांनी द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. 

नागपूरमध्येही पात्रताधारकांचे लाक्षणिक उपोषण

पुण्यातील सेट, नेट, पीएचडी धारकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरमध्येही पात्रताधारक लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. विदर्भातील विविध जिल्‍ह्यातील पात्रताधारक याठिकाणी आंदोलन करत आहेत. सरकारने त्‍वरित भरती बंदी उठवून प्राध्यापक भरती सुरू करावी, अशी मागणी येथील पात्रताधारकांनी केली.

Image may contain: 9 people, including Kuldeep Ambekar, people smiling, child and outdoor

दरम्यान, सहाय्‍यक प्राध्यापक पदांच्या भरतीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे उच्‍चशिक्षित पात्रताधारकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. त्याविरोधात राज्यभर आंदोलने झाली. परंतु, सरकारने अद्याप योग्य दखल घेतली नाही. तसेच भरतीवरील बंदी उठवली नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे.