होमपेज › Pune › चालत्या टेम्पोवर दरोडा; ५२ हजार पळविले

चालत्या टेम्पोवर दरोडा; ५२ हजार पळविले

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:46AMइंदापूर ः प्रतिनिधी 

इंदापूर-अकलूज राज्य महामार्गावरील विठ्ठलवाडी गावानजीक टेम्पो चालकाला तलवार लावून बावन्न हजार रुपये पळवून नेल्याची घटना सोमवारी( दि. 18) पहाटे ी घडली.यासंदर्भात अबुबकर उमर शेख (वय 22 रा. नाना पेठ, पुणे) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

यासंदर्भातील सविस्तर हकीकत अशी की,  18 जून रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास  इब्राहीम फतूरहेमान शेख,मजहर दाऊद शेख, जावीद अब्दुलकादर शेख असे तिघे जण अकलूज येथील आठवडे बाजारासाठी निघाले. इब्राहीम शेख गाडी चालवत होते.  पुणे-सोलापूर रस्त्याने प्रवास करून इंदापूर येथून अकलूजकडे जात असताना गलांडवाडी नं.2 गावच्या जवळ विठ्ठलवाडी येथील ओढ्यातून जात असताना पहाटे एका नंबर नसलेल्या मोटारसायकलवर दोन अनोळखी चोरटे तोंडाला रुमाल बांधून आले व टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला.

परंतु शेख यांनी त्यांना कट मारून पुढे अकलूज बाजूकडे जात असताना विनय गॅस एजन्सीसमोर चढावर दोन मोटारसायकल (नंबर नसलेल्या) वरुन तिघेजण आले. टेम्पोला मोटारसायकली आडव्या मारून, ‘कारे तू असा कसा गाडी चालवतो’, असे म्हणून त्यामधील एकाने टेम्पोच्या चालकीच्या बाजूच्या काचेमधून हात घालून  टेम्पोची चावी काढून घेऊन दोन्ही बाजूने टेम्पोमध्ये चढून तलवारीचा धाक दाखवून शेख व  जावीद अब्दुल कादर शेखच्या गळ्याला तलवार लावून  पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेले पन्नास हजार रुपये काढून घेतले. 

तसेच शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेले दोन हजार रुपये पळवून नेले. त्यावेळी शेख, तसेच जावीद यांनी आरडाओरडा केल्याने टेम्पोत मागे झोपलेले तिघेजण जागे झाले. टेम्पोमधून खाली आले असता ते पाचही चोरटे तीन मोटारसायकलवरून अकलूज कडे पळून गेले.  पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करत आहेत.