Tue, Jul 16, 2019 14:03होमपेज › Pune › गुंतवणूकदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

डीएसके खटला फास्ट ट्रॅकवर चालवा

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

डी़  एस़  कुलकर्णी यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदार आणि ठेवीदारांनी एक समन्वय समिती स्थापन करून त्यांच्यावरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, हा खटला तातडीने निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. 

डीएसके यांच्या कंपनीत गुंतवणूक करणारे जवळपास 100 गुंतवणूकदार, ठेवीदार यांची मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका येथे रविवारी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती़  याबाबत दीपक फडणीस यांनी सांगितले की, ‘डीएसके’ यांच्या कंपनीत गुंतवणूक केलेले गुंतवणूक करणारे व ठेवीदारांमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 

या गुंतवणुकीच्या व्याजावर अनेकांचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र याबाबत येणार्‍या बातम्यांमुळे निर्माण झालेल्या शंका निरसनासाठी आम्ही नियमितपणे भेटतो. विजय कुंभार यांच्याकडूनही आम्ही निरसन केले आहे. डीएसके यांच्या मालमत्तेचा लिलाव करुन सर्वात आधी सरकारी देणी, त्यानंतर इतरांचे व शेवटी गुंतवणूकदारांना त्यांची देणी मिळणार आहे़त.

त्यामुळे यातील 60 टक्क्यांहून अधिक लोक 75 वर्षांच्या पुढील असल्याने त्यांना लवकर न्याय मिळावा, यासाठी हे खटले फास्ट ट्रॅकवर चालवावेत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून तपास अधिकारी आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे़  तरीही हे खटले लवकर चालविण्यासाठी आपण स्वतंत्र वकील नेमावा, असे काही जणांचे म्हणणे आहे़  पण, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही़