Mon, Nov 19, 2018 13:06होमपेज › Pune › फिल्मी स्टाईलने २७ लाख रूपयांची रोकड पळवली

फिल्मी स्टाईलने २७ लाख रूपयांची रोकड पळवली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पेट्रोल पंपावर जमलेली रोकड कारमधून घेऊन जाणाऱ्याला भरदिवसा आडवून फिल्मी स्टाईलने चालकावर कोयत्याने वार करून २७ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी १२ वाजता बिबेवाडी कोंढवा रोडवर हा खबळजनक प्रकार घडला आहे. 

बिबेवाडी-कोंढवा रोडवर आम्रपाली पेट्रोल पंप आहे. तेथे तीन दिवस जमलेली २७ लाख रूपयांची रोकड बँकेत घेऊन जात होते. त्यावेळी दोन दुचाकीस्‍वारांनी कारला दुचाकी आडवी लावली. कार थांबवल्यानंतर दुसऱ्याने चालकावर कोयत्‍याने वार करून कारमधील २७ लखांची रोकड घेतली व पसार झाले. पसार झालेल्‍या दोघांनी एक दुचाकी घटनास्‍थळीच टाकून दिली आहे.

Tags : Pune,  bibewadi, kondhwa, rood stolen


  •