Thu, Jun 20, 2019 06:29होमपेज › Pune ›

थेरगाव कार्यालयातून १००  कोटींचा मिळकतकर
 

थेरगाव कार्यालयातून १००  कोटींचा मिळकतकर

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:46AMपिंपरी  : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये थेरगाव कार्यालयातून तब्बल 99 कोटी 73 लाख रुपयांचा मिळकतकर जमा करण्यात आला आहे. पाठोपाठ सांगवी कार्यालयातून 43.44 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. 
शहरात एकूण 4 लाख 83 हजार 463 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेच्या वतीने मिळकतकर आकारणी केली जाते. पालिकेला 2017-18 या आर्थिक वर्षातून शहरभरातून मिळकतकरातून गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक 421 कोटी 8 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न थेरगाव करसंकलन कार्यालयातून प्राप्त झाले आहे.  

मिळकत स्वीकारण्यासाठी पालिकेने शहरात 16 ठिकाणी कार्यालये आहेत. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, चर्‍होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी-बोपखेल या ठिकाणी मिळकत करसंकलन कार्यालये आहेत. थेरगाव परिसरात मध्यमवर्गीय रहिवाशांचे अधिक वास्तव्य आहे. थेरगाव करसंकलन कार्यालयाच्या हद्दीत एकूण 84 हजार 704 मिळकती आहेत. या मिळकतधारकांकडून पालिकेला तब्बल 99 कोटी 73 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्या खालोखाल सांगवी कार्यालयातून 43 कोटी 44 लाख, भोसरीतून 32 कोटी 43 लाख, पिंपरी गावातून  31 कोटी 22 लाख, चिंचवडमधून 29 कोटी 70 लाख, आकुर्डीतून 27 कोटी 52 लाख, पालिका भवनातून 27 कोटी 3 लाख आणि चिखली कार्यालयातून 25 कोटी 68 लाख  रुपयांचा महसूल वर्षभरात मिळाला आहे.

Tags : Pimpri, Rs 100 crore, income, tax, Thergaon office