Tue, Sep 25, 2018 06:38होमपेज › Pune › रोलबॉल फेडरेशन करंडक : महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद

रोलबॉल फेडरेशन करंडक : महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

दुसर्‍या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला तर, मुलींच्या गटात जम्मू काश्मीर संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना विजेतेपद पटकावले. 

मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने आसाम संघाला 10-1 असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून आदित्य गनेशवाडे, मिहीर साने व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी 2 तर,  योगेश तायडे, अजिंक्य जमदाडे, भार्गव घारपुरे यांनी प्रत्येकी 1 गोल करून  संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचला. एकतर्फी झालेल्या लढतीत आसाम संघाकडून दीपज्योती याने  1 गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. 

या  गटात अतितटीच्या लढतीत जम्मू काश्मीर संघाने आसाम संघाला 2-1 असे पराभूत केले. जम्मू काश्मीर संघाच्या अंकिता चोप्रा  व  सिमरन रैना यांनी प्रत्येकी 1 गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. 

आसाम  संघाकडून मनीषा प्रधान हिने  1 गोल करताना संघासाठी दिलेली लढत अपुरी ठरली. तत्पूर्वी, मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने जम्मू काश्मीर संघाला 6-5 असे पराभूत केले.  महाराष्ट्र संघाकडून संजोग तापकीर 2, आदित्य गणेशवडे 2  तर मिहीर साने आणि योगेश तायडे यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवले.