Wed, Nov 21, 2018 01:04



होमपेज › Pune › खांबाला रिक्षा धडकल्याने चालक ठार 

खांबाला रिक्षा धडकल्याने चालक ठार 

Published On: Jul 10 2018 1:21PM | Last Updated: Jul 10 2018 1:21PM



पिंपरी : प्रतिनधी 

डांगे चौक हिंजवडी रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री अकाराच्या सुमारास घडली. 

सतीश गोविंद पंडागळे (वय ५७) असे या अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंडागळे रिक्षा घेऊन हिंजवडीच्या दिशेने जात असताना रात्रीच्या अंधारात त्यांना खांबाचा अंदाज आला नाही. त्यांची रिक्षा खांबावर जाऊन आदळली. या अपघातात पंडागळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्य़ात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.