Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Pune › सेट परीक्षेचा निकाल जाहीर

सेट परीक्षेचा निकाल जाहीर

Published On: May 24 2018 8:32PM | Last Updated: May 24 2018 8:45PMपुणे : पुढारी ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या सहाय्‍यक प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षा (सेट)चा निकाल जाहीर झाला. २८ जानेवारी २०१८ रोजी महाराष्‍ट्र आणि गोवा राज्यांत झालेली सेट परीक्षा ६२ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी ४ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६.५२ टक्‍के इतका निकाल लागला आहे. 

►सेट परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा

२८ जानेवारी रोजी सेटची परीक्षा झाल्यानंतर निकालासाठी विलंब झाला होता. अखेर आज (दि. २४ मे) रोजी ४ महिन्यानंतर निकाल जाहीर झाला. दरम्यान, सेट आणि नेटची परीक्षा नियमित होत आहेत. परंतु सहाय्‍यक प्राध्यापक पदांच्या भरतीवर राज्यात बंदी आहे. त्यामुळे राज्यातील सेट, नेट, पीएचडी धारकांची राज्यभर आंदोलने सुरू आहेत. 

No automatic alt text available.

Tags : SET for Assistant Professor, Savitribai Phule Pune University, SET exam, SET exam 2018