Tue, Jul 16, 2019 09:42होमपेज › Pune › शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा बंदला शहरात प्रतिसाद

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा बंदला शहरात प्रतिसाद

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 07 2018 11:35PMपिंपरी : प्रतिनिधी 

राज्यभरामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांसाठी  7 ते 9 ऑगस्ट दरम्यान पुकारलेल्या बंदला पिंपरी -चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला. 

शहरातील बहुतांश शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या समोर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करून संपास पाठिंबा दिला. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 करावे, या मागण्यांसाठी हा तीनदिवसीय लाक्षणिक संप पाळण्यात येत आहे. 

संपाची सूचना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्यातर्फे देण्यात आली होती. मध्यवर्ती संघटनेने मागण्यांबाबत वेळोवेळी पत्रव्यवहारही केला. मात्र, त्याची दखल घेतली नसल्यामुळे संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.