Tue, Nov 20, 2018 19:31होमपेज › Pune › आरक्षणप्रश्‍नी विद्यार्थ्यांची राज्यमंत्र्यांशी चर्चा

आरक्षणप्रश्‍नी विद्यार्थ्यांची राज्यमंत्र्यांशी चर्चा

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 1:21AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

एमपीएससीद्वारे शासनाच्या 13 ऑगस्टच्या परिपत्रकाचा चुकीचा आधार घेत बेकायदेशीरपणे चुकीची भरती प्रक्रिया राबवत मागासवर्गीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यार्ंना डावलण्यात आले आहे. त्यामुळे ही चुकीची अंमलबजावणी रद्द करत नव्याने भरती परीक्षा घेण्याची मागणी करत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2 जानेवारीस बैठक आयोजित करून प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन राज्यमंत्री कांबळे यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

युवा जनता दल युनायटेडच्या शिष्टमंडळाने एमपीएससीच्या समांतर आरक्षणासंदर्भात शुक्रवारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेतली. या वेळी कुलदीप आंबेकर, राकेश नेवासकर, नीलेश निंबाळकर, फैय्याज इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी आयोगाद्वारे समांतर आरक्षण लागू करण्यात आल्याने मुलाखतीला डावलण्यात आलेल्या मनीषा सानप व ज्योती किसवे या विद्यार्थिनींनी आपली व्यथा कांबळे यांच्यासमोर मांडली. 

2014 च्या समांतर आरक्षणाच्या परिपत्रकाचा आधार घेत ज्या मागसवर्गीय महिलांना, खेळाडूंना मुख्य परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आले त्यांना ती संधी मिळावी. तसेच यापुढे समांतर आरक्षणासाठी काढलेल्या परिपत्रकाची चुकीची अंमलबजावणी थांबवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आली.