Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Pune › नाट्यगृहांची दुरुस्ती लवकरच 

नाट्यगृहांची दुरुस्ती लवकरच 

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:42AMपिंपरी ः पूनम पाटील

शहरातील महत्वाची नाट्यगृह एकाच वेळी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठणठणाट असून कलाकारांना कार्यक्रम सादर करण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहेत. परंतु, दुरुस्तीदरम्यान नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असून येत्या चार महिन्यानंतर दुरुस्तीची कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यात नाट्यगृहांचा पडदा  उघडणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. 

प्रा. मोरे प्रेक्षागृहामध्ये देणार अत्याधुनिक सुविधा शहरातील चार नाट्यगृहांपैकी केवळ दोनच नाट्यगृह सुरु असून एक मे पासून चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह दुरुस्तीकरिता चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत यावेळच्या दुरुस्तीत अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराची नुतनीकरणाची मुदत संपून गेली होती. परंतु, आता फेरनिविदा काढण्यात आली असून नुतनीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखी तीन महिने लागणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

लाखोंचे उत्पन्न बुडीत

पिंपरी व चिंचवडमधील दोन नाट्यगृहे दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नाट्यगृहातून मिळणारे लाखोंचे उत्पन्न बुडत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिराचे वार्षिक उत्पन्न 27 लाख रुपये असून मागील वर्षापासून ते नुतनीकरणाच्या कामासाठी बंदच आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे वार्षिक उत्पन्न लाखांच्या घरात आहे. त्यामुळे नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे झटपट करावीत आणि होणारे ऩुकसान भरुन काढावे अशी अपेक्षा शहरातील कलाकारांनी व्यक्त केली आहे.