Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Pune › पुणेकरांनाही मंत्रमुग्ध करणारे तरूणसागरजी महाराज :  मिलिंद फडे 

पुणेकरांनाही मंत्रमुग्ध करणारे तरूणसागरजी महाराज :  मिलिंद फडे 

Published On: Sep 01 2018 5:05PM | Last Updated: Sep 01 2018 4:07PMपुणे : प्रतिनिधी

जैन मुनी तरुण सागर महाराज यांचे आज (१ सप्टेंबर) ५१व्या वर्षी निधन झाले. दिल्‍लीतील कृष्‍णानगर येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजारी होते. जैन समाजासह इतर धर्मियांमध्येही तरूण सागर महाराज यांच्या वाणीचा मोठा प्रभाव होता. सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलींद सागर यांनी तरूण सागरजी महाराजांच्या पुणे भेटीविषयी आठवणी जागवल्या.

तरूण सागरजी महाराज २००४ साली डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा पुण्यात आले होते. यावेळी, सहकार नगर येथे संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भैय्युजी महाराज याचबरोबर रामदेव बाबांनी हजेरी लावली होती. यावेळी, महाराजांच्या प्रवचनाने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनतर महाराजांनी दोनदा पुण्याला भेट दिली होती. भगवान महावीरांना मंदीराच्या गाभार्यातून बाहेर आणत त्यांचे विचार चौका-चौकातील लोकांपर्यत रूजविण्याचे काम त्यांनी केले. सरळ, साध्या भाषेत त्यांनी भगवान महावीरांचे विचार रूजविण्याचे काम केले. बहुजन समाजातही जैन समाजाचे धर्मगुरू म्हणून तरूणसागरजी महाराज यांची ओळख होती. याबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हरीयाणा, राजस्थान आदी राज्यांच्या विधासभांमधून प्रवचन करणारे ते एकमेव साधू होते.