Thu, Jun 27, 2019 15:44



होमपेज › Pune › मुलीवर बलात्कार करणार्‍या दोघांचा जामीन फेटाळला

मुलीवर बलात्कार करणार्‍या दोघांचा जामीन फेटाळला

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 12:57AM

बुकमार्क करा





पुणे ः प्रतिनिधी 

पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या दोघांचा जामीन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी फेटाळून लावला आहे.

संजित रंजित चासा (32, रा. त्रिपुरा) आणि मंगल शुक्‍लवैद्य (32, आसाम) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस असताना सोसायटीत राहणार्‍या पाच वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केला. हा प्रकार 12 सप्टेंबर 2017 रोजी घडला. या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामीन मिळण्यासाठी दोघांनीही अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जाला अतिरिक्‍त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध करताना वैद्यकीय तपासणीमध्ये दोघांनीच मुलीवर बलात्कार केला आहे.

त्यांची पोटेन्सी टेस्टही पॉझीटीव्ह आली आहे. दोघांना जामिनावर सोडल्यास ते पळून जाण्याची व पुन्हा कधीही न मिळून येण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे आहेत.  मुलीचा न्यायाधीशांसमोरील जबाब नोंदवून व्हायचा आहे. दोघेही साक्षीपुराव्यांवर दबाव आणण्याची शक्यता पाहता दोघांचाही जामीन फेटाळण्याची मागणी अ‍ॅड. बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.