Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Pune › विद्यार्थ्यांनी केले वाहतुकीचे नियमन 

विद्यार्थ्यांनी केले वाहतुकीचे नियमन 

Published On: Jan 15 2018 7:26AM | Last Updated: Jan 15 2018 1:10AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी येथील डॉ. डी. वाय . पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रोट्रॅक्ट क्लब ऑफ डीवायपीव्हीपी’ च्या विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पिंपरी पोलिसांना मदत केली. 
महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी वेगवेगळे गट करून नाशिक फाटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, फिनोलेक्स चौक व इतर महत्वाच्या ठिकाणी वाहनधारकांना वाहतुक नियमांबद्दल जनजागृती केली.  हेल्मेट घालणारे  दुचाकीस्वार, सिट बेल्ट घालणारे चारचाकी चालक व लाल दिवा लागल्यावर झेब्रा क्रॉसिंग च्या अगोदर वाहन थांबवून पादचार्‍यांना मार्ग देणार्‍या वाहनचालकांना विद्यार्थ्यांनी धन्यवादाचे स्टिकर देऊन कौतुक केले. तर वाहतूक नियमन तोडणार्‍या वाहन चालकांचे प्रबोधन केले.

 याप्रसंगी पिंपरी वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. एस. निंबाळकर, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्रा. धीरज अग्रवाल व इतर वाहतूक पोलिसांनी मकरसंक्रांतीनिमित्त वाहन चालकांना तिळगुळाचे वाटप केले. डॉ.डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश माळी व उप प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विधी अग्रवाल, उपाध्यक्ष अभिषेक रावत, आदित्य सिंग, सचिव अनुराधा, साई स्वरुप, शुभम चोपडे व  सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.