Mon, Jul 15, 2019 23:45होमपेज › Pune › राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या ६९ जागांसाठी भरती

MPSC: राज्यसेवेच्या ६९ जागांसाठी भरती

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:32AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली असून एकूण 69 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 18 जानेवारी 2018 पर्यंत करता येणार आहे. आयोगाद्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 69 जागांसाठी भरती करण्याची घोषणा गुरुवारी केली. 

यावेळी आयोगाद्वारे घोषणा करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या परीक्षेद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (6 जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (8 जागा), तहसीलदार (6 जागा), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (4 जागा), कक्ष अधिकारी (26 जागा), सहायक गट विकास अधिकारी (16 जागा), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (2 जागा), सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2018  आहे. यासंबंधीची अधिक माहिती www. mahaonline.gov.in Am{U www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

कमी जागांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली. दरम्यान, यावर्षी जागांची संख्या कमी असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी आयोगाद्वारे सुरूवातीला 155 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. दरम्यान, त्यानंतर आयोगाने जागांची संख्या 377 जागा केल्या. मात्र, यावेळी आयोगाद्वारे फक्त 69 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.