होमपेज › Pune › दहा दिवसाच्या बाळाच्या हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

दहा दिवसाच्या बाळाच्या हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी

‘पल्मोनरी अँटरेसिया’ने ग्रस्त असलेल्या 10 दिवसाच्या बाळावर पुण्यात यशस्वी हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मल्यावर या बाळाचे शरीर हे निळ्या रंगाचे होते आणि वजन 2.1 किलो एवढे होते. आतिशय नाजूक स्थिती असलेल्या बाळावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सोलापूरमध्ये जन्मलेल्या बाळाला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला पुण्यातील शासकीय रुग्णालयातील एनआयसीयू दाखल करण्यात आले. बाळावर अत्याधुनिक साहाय्याने उपचार करणे आवश्यक असल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यामुळे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल हलविण्यात आले. 

त्यवेळी बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राहुल सराफ यांनी बाळाची तपासणी केली. डॉक्टरांच्या निदानामध्ये  बाळाच्या हृदयाच्या उजव्या भागातून रक्तस्त्राव बंद झाल्यामुळे फुफ्फुसांपर्यंत रक्त पोहचत नसल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी बाळाची ओपन हार्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. बाळाची स्थिती नाजूक असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठी अतिशय आव्हानात्मक काम होते.
शस्त्रक्रिया केलेल्या बाळाच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. रुग्णाचे वडील हे सोलापूरमध्ये वेल्डिंगचे काम करतात. या शस्त्रक्रियेसाठी पैसे उभे करणे त्यांच्यासाठी अशक्य होते, म्हणून ज्युपिटर फाउंडेशन व मुकुल माधव फाउंडेशने ‘हृदय स्पर्श’ योजने अंतर्गत या शस्त्रक्रियेचा व औषधांचा खर्च उचलला आहे.