बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Last Updated: Jan 22 2020 6:04PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामतीत शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. विशाल सुनील महाजन (वय २०, रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक वाचा : शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा पूर्ण उघडला

याबाबत इंदापुरातील एका महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली. १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत भिगवण व बारामतीतील लॅाजवर ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना भुलथापा देत, प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत सुनीलने तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध केले.  

अधिक वाचा : पुणे : आयटी कंपनीतील तरूणीसोबत अनैसर्गिक कृत्य करणारा तरूण अटकेत  

१५ जानेवारी रोजी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत जेजुरी येथे नेले. दरम्यान, तिच्या डोक्यात कुंकू भरून तिच्याशी फोटो काढत ते व्हाॅट्सअप स्टेटसला लावत वारंवार शरीरसंबंधाची मागणी केली. दरम्यान पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.