होमपेज › Pune › आयटी कंपनीतील तरुणीवर बलात्कार

आयटी कंपनीतील तरुणीवर बलात्कार

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 1:26AM पुणे : प्रतिनिधी 

पार्टी केल्यानंतर दारूच्या नशेत आयटी कंपनीतील सहकार्‍याने तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार वाघोली येथे समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या सहकार्‍यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मूळची मुंबईतील राहणारी आहे. ती सध्या पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरी करते, तर ती वडगाव शेरी परिसरात  राहण्यास आहे.   वाघोली परिसरात राहणार्‍या तिच्या कंपनीतील सहकारी मित्रासोबत तिने दि. 17 मे रोजी अन्य मित्राच्या फ्लॅटवर पार्टी केली. त्या ठिकाणी मद्यपान केल्यानंतर दोघेही नशेत होते. त्यावेळी तरुणी नशेत व झोपेत असताना त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने दिली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  लोणीकंद पोलिस अधिक तपास करत आहे.