Fri, Apr 26, 2019 03:28होमपेज › Pune › टेम्पोमध्ये मृतदेह आढळलेल्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार 

टेम्पोमध्ये मृतदेह आढळलेल्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:51PMपुणे : प्रतिनिधी 

ताडीवाला रस्त्यावर टेम्पोमध्ये मृतदेह आढळून आलेल्या, सहा वर्षीय चिमुकलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असतानाच शवविच्छेदन अहवालात आणखी गंभीर बाब समोर आली असून, या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकाला विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

गणेश बसवराज गायकवाड (वय 20, रा. ताडीवाला रस्ता, मूळ रा. कर्नाटक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 4 जुलै रोजी सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह ताडीवाला रोड परिसरामध्ये टेम्पोमध्ये सापडला होता. याबाबत बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी गायकवाड याला अटक केली आहे. 

सतत टेम्पो वाजवून मुलगी त्रास देत असल्याने तिचा खून केल्याचे त्याने सांगितले होते; मात्र या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गणेश गायकवाडवर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यातीलकलमानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड याला विशेष न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.