Thu, Nov 22, 2018 00:14होमपेज › Pune › मंदिरात खेळताना  चिमुरडीवर बलात्कार

मंदिरात खेळताना  चिमुरडीवर बलात्कार

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:35AMपिंपरी : प्रतिनिधी

मंदिरात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार  करणार्‍या  नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्‍कादायक घटना शनिवारी (दि. 9) सकाळी पिंपरी खराळवाडी येथील एका मंदिरात घडली. या घटनेबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर ही घटना उघडकीस झाली. पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकरणी रोहन भांडेकर (वय. 18 रा. खराळवाडी) याला पिंपरी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 18 जूनपर्यंत  पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. मुलगी खेळत असताना आरोपीने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितल्याने, आईने पिंपरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली.  तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन कडाळे करत आहेत.