Sat, Jul 20, 2019 10:52होमपेज › Pune › विनापरवाना वर्गणी मागितल्यास खंडणीचा गुन्हा

विनापरवाना वर्गणी मागितल्यास खंडणीचा गुन्हा

Published On: Sep 06 2018 8:51PM | Last Updated: Sep 06 2018 8:51PMपुणे : प्रतिनिधी

ट्रस्ट वगळता इतर गणेश मंडळांनी गणशोत्सव साजरा करण्यासाठी धर्मादाय विभागाची पूर्व परवानगी घेणे आवशक असते. पण, गणेशोत्सव अवघा सात दिवसांवर येउन ठेपला असताना आणि शहरात हजारोंच्या संख्येने मंडळे असताना त्यापैकी केवळ ९३ मंडळांनी आतापर्यंत उत्सवाचा परवाना घेतला आहे. तर ऑनलाईन परवान्यालाही खूप कमी प्रतिसाद असून आतापर्यंत केवळ २६ जणांनी परवाना मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. 

गणेशोत्सव जवळ येत असून हा उत्सव साजरा करण्यासाठी लागणारी वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय विभागाकडून परवानगी घेणे प्रत्येक मंडळांना बंधनकारक आहे. हा परवाना मिळण्यासाठी जर मंडळ नवीन असेल तर त्यांना नगरसेवक व ग्रामपंचायत असेल तर सरपंचाचे शिफासरसपत्र सादर करावे लागते. तसेच सदस्यांचे पॅन कार्ड किंवा आधार कार्डाची झेरॉक्स जोडणे आवशक आहे. जुने मंडळ असेल तर त्यांना गेल्या वर्षीचा उत्सवाचा जमा व खर्च केलेला ताळेबंद सादर करावा लागतो. हा हिशोब जर पाच हजाराच्या आत असेल तर तो त्यांनी सादर केला तरी चालतो. जर पाच हजाराच्या पुढे असेल तर नोंदणीकृत सनदी लेखापाल (सीए) द्वारे सादर करणे आवशक आहे.

शहरात अंदाजे तीन हजार मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. पण, त्यापैकी केवळ १० टक्केच मंडळे परवानगी घेत असल्याचे धर्मादाय विभागाकडील परवाना आकडेवारीवरून दिसून येते. याचा अर्थ उरलेले ९० टक्के मंडळे ही विनापरवाना वर्गणी गोळा करत असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण भागातील मंडळांनी देखील धर्मादाय कार्यालयातून परवाना घेणे आवशक आहे. पण, फार थोडया मंडळांकडून ही परवानगी घेण्यात येते. ही परवानगी गणेशोत्सव सूरू होईपर्यंत घेता येणार आहे. 
  
विनापरवाना वर्गणी मागितल्यास खंडणीचा गुन्हा

जर गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करायची असेल तर त्यासाठी धर्मादाय कार्यालयाचा परवाना हवा असतो. जर हा परवाना नसताना वर्गणी गोळा केली असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांवर धर्मादायकडून कारवाई तसेच पोलिसांत गुन्हा दाखल होउ शकतो, अशी माहिती सहायक धर्मादाय आयुक्त राहूल चव्हाण यांनी दिली.