Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Pune › दहा लाख रुपयांची खंडणी मागितली

दहा लाख रुपयांची खंडणी मागितली

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:12AMपिंपरी : प्रतिनिधी

तुमच्या हॉटेलची महत्वाची कागदपत्रे आमच्या हाताला लागली  आहेत, असे सांगून दोघांनी दहा लाखांची खंडणी मागितली. हे हॉटेल शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍याचे आहे.  याप्रकरणी नेताजी काशीद (50, मोरेवस्ती, चिखली, पुणे) यांनी निगडी पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीद यांचा हॉटेलचा व्यवसाय असून ‘तुमच्या हॉटेल संदर्भात अतिशय महत्वाची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तुमच्या हॉटेलच्या जागेची गुंठेवारी झालेली नाही. त्यामुळे 10 लाख रुपये आणून द्या. अन्यथा मी हॉटेल सील करण्यास भाग पाडेन,  अशी धमकी 19 जून 2017 रोजी दोन अनोळखी इसमांनी त्यांना दिली होती. काशीद यांच्याकडे खंडणीची मागणी दोघांनी केली. तसेच, साने चौक येथील केबल नेटवर्कचे कार्यालयातून एक सेटअप बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेले होते. याबाबत काशीद यांनी 27 जून 2017 रोजी पोलिस आयुक्त व निगडी पोलिसांना लेखी तक्रार अर्ज केला होता. नऊ महिन्यानंतर पोलिसांनी सोमवारी (दि.16) दोन जणविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

पिंपरी : कस्पटेवस्ती, वाकड येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमधील एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सोळा बॅटर्‍या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अमोल शिंदे (37, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिलेली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कस्पटेवस्ती येथील महालक्ष्मी कॉम्पलेक्समध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमधुन चोरट्यांनी बॅटर्‍या चोरुन नेल्या आहेत.

Tags : Pimpri, Ransom, Rs, 10, lakhs, sought