Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Pune › रांजणगावात ठेकेदाराकडून युवतीवर बलात्कार

रांजणगावात ठेकेदाराकडून युवतीवर बलात्कार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रांजणगाव गणपती : वार्ताहर

कंपनीमध्ये काम मागण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय युवतीवर ठेकेदाराने मारहाण व दमदाटी करून बलात्कार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.  याबाबत पीडित मुलीने  स्वतःहून रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शरद फंड असे या संबंधित आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही शनिवारी (दि.24) सायंकाळी  नोकरी मागण्यासाठी शरद फंड याच्या

कार्यालयात आली असता शरद फंड याने तिच्याशी जवळीक साधून तिला मारहाण व दमदाटी करून तिच्यावर बलात्कार केला असल्याने शरद फंड याच्यावर कलम 376, 506, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार साहायक पोलिस निरीक्षक अमोल गोरे, मंगेश थिगळे हे करीत आहेत.
 

 

 

tags : Ranjangaon,news,Contractors girl raped issue in Ranjangaon Ganpati


  •