Thu, Feb 21, 2019 09:03होमपेज › Pune › राष्‍ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्‍त रांगोळी प्रदर्शन  

राष्‍ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्‍त रांगोळी प्रदर्शन  

Published On: Jun 12 2018 10:08AM | Last Updated: Jun 12 2018 10:03AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'भावरंग' रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, अभिनेत्री गिरीजा प्रभू, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, शहराध्यक्ष बाबा पाटील, प्रवक्ते योगेश सुपेकर उपस्थित होते.

रांगोळीकार सोमनाथ भोंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलादालनात २१ पोट्रेट रांगोळ्या साकारल्या आहेत. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साहित्य, कला व सांस्कृतिक विभागातर्फे या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.