Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Pune › पुणे स्टेशनवर दिव्यांगांसाठी रॅम्प

पुणे स्टेशनवर दिव्यांगांसाठी रॅम्प

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

दिव्यांग प्रवाशांना रेल्वेमधून चढणे-उतरणे आता सुलभ होणार आहे. पुणे स्टेशनवर शारीरिक व्याधी असणार्‍यांसाठी फिरत्या रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, व्हील चेअरवर बसून कोणाच्याही मदतीशिवाय ते डब्यात जाऊ शकणार आहेत.

या रॅम्पला डब्यातील जिन्याच्या येथे बसविले जाऊ शकते. त्याद्वारे दिव्यांग व्यक्ती रेल्वेत सहज चढू किंवा उतरू शकणार आहेत.

हा रॅम्प पुणे स्टेशनवर स्टेशन मॅनेजर कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. या सुविधेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.